दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून तात्काळ निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांर्भिय लक्षात घेवून राज्यसरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून दुष्काळाचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. विशेषत: परतीच्या पावसाने निराशा केल्याने खरीपाचे पीक हातचे गेले असून रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आले आहे त्यामुळे राज्यसरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही शरद पवार यांनी पत्रासोबत जोडली असून मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन

जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *