अजित पवार यांच्या ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समन्वयकांची नेमणूक राज्यातील दौऱांची जबाबदारी या पदाधिकारी आणि मंत्र्यांवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे.

जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची तर सहसमन्वयक म्हणून आमदार राजेश विटेकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राजेंद्र जैन, श्रीमती सुरेखाताई ठाकरे, सुरेश घुले,श्रीमती राजलक्ष्मी भोसले, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदींवर जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

नियुक्त करण्यात आलेले समन्वयक

दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्माराव बाबा आत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
अनिल भाईदास पाटील

व सहसमन्वयक म्हणून

आ राजेश विटेकर
सौ.रुपालीताई चाकणकर
राजेंद्र जैन
श्रीमती सुरेखाताई ठाकरे
सुरेश घुले
श्रीमती राजलक्ष्मी भोसले
सूरज चव्हाण
लतिफ तांबोळी

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे अजित पवार अपघात प्रकरणी आणि नरहरी झिरवळ प्रकरणी भाष्य पवार कुटुंबियांना त्रास होईल असे कोणी करू नये आणि नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अद्याप काहीही नाही

अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *