भाजप सरकार हाय हाय… विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आमदारांची घोषणाबाजी

मुंबई: प्रतिनिधी

गली-गली में शोर है…भाजप सरकार चोर है…भाजप सरकार हाय हाय…अशा घोषणा देत आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आजही मराठा आरक्षण सभागृहाच्या पटलावर ठेवा आणि दुष्काळी मदत जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणा करत परिसर दणाणून सोडला.

विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील मुख्यप्रतोद आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विदयाताई चव्हाण आदींसह काँग्रेसचे आमदार, सपाचे आमदार आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकरानां उच्च न्यायालयाचा दणका ४० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; खटल्याचा मार्ग मोकळा

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा व कागदपत्रांतील फेरफार प्रकरणात आरोपी असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *