शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करू नका कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आले असताना आदरणीय शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही न घेता आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकसभेचे अधिवेशन सुरु असतानाही आदरणीय शरद पवार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याचठिकाणी आदरणीय शरद पवार यांना शुभेच्छा देण्यास त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार दर महिन्याला होणाऱ्या ७ तारखेऐवजी आता ११ ऑगस्ट होणार जमा

दर महिन्याच्या ७ तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *