उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला वांद्रे पश्चिम मधून उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्याची कागदपत्रेही गुजरातच्या तुरुंगात पाठवली

गुजरातच्या तुरुंगात असतानाही बॉलिवूड स्टार सलमान खान यास सतत धमक्या देणे, त्याच्या घराबाहेर गोळीबार करणे आदी गोष्टी करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतेच सलमान खान याचे मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाब सिद्धीकी यांची हत्या केली. त्यानंतरही कोणत्या तरी उत्तर भारतीय विकास सेना नामक राजकिय पक्षाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम येथून उमेदवारी देण्याची ऑफर देत त्या संदर्भातील कागदपत्रे गुजरातच्या तुरुंगात लॉरेंन्स बिश्नोईला पाठविली असल्याची माहिती पुढे आली आहे.

उत्तर भारतीय विकास सेना नामक संस्थेचे राष्ट्रीय कार्यालय अपना लोकशाही दरबार, सुकुमार कॉर्नर, दुसरा मजला १२७ जे.पी रोड, दाऊद बाग लेन अंधेरी पश्चिम मुंबई ४०००५८ या पत्यावर आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल शुक्ला हे असून या महाशयांनी वांद्रे पश्चिम मधून निवडणूक लढविण्याची विनंती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला केली पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी या महाशयांनी नोव्हेंबर १९६६ पासून हिंदू धर्मियांवर नोव्हेंबर महिन्यात केलेल्या अत्याचाराची बतावणी करत या चालू नोव्हेंबर महिन्यातच महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान होत आहे.

त्यामुळे लॉरेन्स बिष्णोईने मुंबईतून वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे. तसेच लॉरेन्स बिष्णोईला निवडणूक लढता यावी यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या कार्यालयास, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिष्णोईला उमेदवारी अर्ज भरण्याची कागदपत्रे जारी केली असून ती भरून आपण वांद्रे पश्चिम मधून निवडणूक लढवावी असा आग्रहही या पत्राद्वारे सुनील शुक्ला यांने केला आहे.

लॉरेन्स बिष्णोईला पाठवलेले हेच ते पत्र

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची मागणी, बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण पुनरुज्जीवित करा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहित केली मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *