अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोगाचे शिवसेना उबाठाला पत्र दिपोत्सव कार्यक्रम खर्चाची आणि आचारसंहिता भंग प्रकरणाची चौकशी सुरु

राज्यातील विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपल्यावर दिवाळीच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानावर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने परावनगी दिली. तसेच या कार्यक्रमात माहिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे हे ही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे या अमित ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केला आणि दिपोत्सवाचा झालेला खर्च अमित ठाकरे यांच्या उमेदवारी खर्चात ग्राह्य धरावा अशी तक्रार शिवसेना उबाठाकडून नुकतीच निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाकडे केली.

त्यावर निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाने मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीची दखल घेत याप्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती शिवसेना उबाठाला एका पत्रान्वये कळविले आहे.

आचारसंहिता भंगाची तसचं कार्यक्रमाचा संपूर्ण खर्चाची चौकशी सुरू करण्यात आल्याच पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठवलंय. माहीम विधानसभेतील मनसे उमेदवार अमित राज ठाकरे यांची उमेदवारी धोक्यात आली असल्याची शक्यता शिवसेना उबाठातील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कालच मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे साजरा होत असलेल्या दीपोत्सव ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कार्यक्रमात होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तसेच सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च येथील स्थानिक माहीम विधानसभेचे मनसे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला ह्या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पत्र पाठविले आहे.

दरम्यान, एकाबाजूला मनसे उमेदवार अमित ठाकरे यांची विधानसभा निवडणूक निर्धोकपणे पार पडावी यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आटापीठा करत आहेत. तसेच भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर माहिम मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीवर दबाव टाकत आहेत. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाकडून अमित ठाकरे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही असे चित्र राजकिय वर्तुळात दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना उबाठाला पाठवलेले हेच ते पत्र

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *