उच्च न्यायालयाचा करण जोहर चित्रपटावरील स्थगिती उठविण्यास नकार करण जोहर यांच्यावरील बायोग्राफीक फिल्म

`शादी के दिग्दर्शक करण और जोहर’ चित्रपटाचे हे शीर्षक प्रथमदर्शनी चित्रपट निर्माता करण जोहरच्या व्यक्तिगत अधिकाराचे उल्लंघन करते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने शुक्रवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला.

इंडियाप्राइड अ‍ॅडव्हायझरी, लेखक संजय सिंग आणि दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात करण जोहर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. चित्रपटाच्या शीर्षकात आपले नाव वापरण्यापासून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्याची मागणी जोहरने केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर १३ जून २०२४ रोजी उच्च न्यायालयाने करण जोहरच्या बाजूने निर्णय देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती दिली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील अंतरिम स्थगिती रद्द करावी, या मागणीसाठी चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा नव्याने केलेल्या याचिकेवर न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. प्रथमदर्शनी चित्रपट निर्माता करण जोहरच्या व्यक्तिगत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे एक मजबूत प्रकरण असल्याचे नमूद करून न्यायालयाने पूर्वीचे स्थगिती आदेश कायम ठेवले.

चित्रपटाच्या शीर्षकात दिग्दर्शक शब्दासह करण आणि जोहर ही नावे वापरली आहेत. निर्मात्यांनी करणचे आरोप नाकारले आहेत. परंतु, आपण चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असून करण आणि जोहर ही नावे दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा संदर्भ अधोरेखीत होत नसल्याचेही न्यायालयाने करण जोहरची याचिका स्वीकारताना न्यायालयाने अंतिरम आदेश देताना स्पष्ट केले होते.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *