प्रकाश आंबेडकर १६,१७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने माहिती

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६, १७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. बोधगया (बिहार) येथे गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध भिक्षूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा आणि सहभाग घेण्यासाठी ते जाणार आहेत.

महाबोधी महाविहार ऍक्ट १९४९ रद्द करा, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागण्या आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते की ते लवकरच बोधगया येथे जातील.

महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येईपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील, असे सुद्धा त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतीपूर्वक आंदोलन केली जात आहेत.

येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी बोधगया येथे होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीत माझ्यासह बौद्ध भिक्षूंनी सामील व्हावे अशी मी प्रत्येक बौद्ध बांधवाला विनंती करतो असे आवाहन ही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

About Editor

Check Also

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु होणार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेता येणार

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *