वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे १६, १७ एप्रिल रोजी बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. बोधगया (बिहार) येथे गेल्या अनेक दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध भिक्षूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा आणि सहभाग घेण्यासाठी ते जाणार आहेत.
महाबोधी महाविहार ऍक्ट १९४९ रद्द करा, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागण्या आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते की ते लवकरच बोधगया येथे जातील.
महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येईपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील, असे सुद्धा त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतीपूर्वक आंदोलन केली जात आहेत.
येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी बोधगया येथे होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीत माझ्यासह बौद्ध भिक्षूंनी सामील व्हावे अशी मी प्रत्येक बौद्ध बांधवाला विनंती करतो असे आवाहन ही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मैंने वादा किया था की जब तक महाबोधि महाविहार बौद्धों के हाथ में नहीं आता तब तक भारतीय बौद्ध महासभा और वंचित बहुजन आघाडी की लड़ाई जारी रहेगी!
16 अप्रैल को मैं बिहार जा रहा हूँ और 16 और 17 अप्रैल को बोध गया में रहूँगा।
मैं प्रत्येक बौद्ध से अनुरोध करता हूं कि वे 16 और 17 अप्रैल…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 30, 2025
Marathi e-Batmya