सोलापूरात १४९ मतदानाच्या मशिन्स बदलल्या मतदान यंत्रे अनेक ठिकाणी नादुरूस्त असल्याच्या तक्रारी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी घेण्यात आले. मात्र सकाळच्या सत्रात दक्षिण सोलापूर, पंढरपूरसह सोलापूर शहरातील अनेक मतदान केंद्रातील मतदान यंत्रे नादुरूस्त झाल्याने. सुरुवातीला ही संख्या ४ ते ५ असलेली संख्या एकूण १४९ वर पोहोचली. यामध्ये ६९ बॅलेट युनिट, १८ कंट्रोल यंत्रांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. बंद पडलेली मशीन पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार, तलाठी यांची चांगलीच धावपळ उडाली होती़. दरम्यान मतदान सुरळीत होत आहे़ बंद पडलेल्या मशीनचे ठिकाणी तातडीने मशीन उपलब्ध करून देण्यात येत आल्या.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, समृद्धीसह सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस

भाजपा महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून कंत्राटदार, ठेकेदार यांच्या माध्यमातून केवळ कमीशन खाण्याचे उद्योग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *