प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली

राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील ईएसआयसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दुरुस्ती व नूतनीकरण काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

या संदर्भात सदस्य मुरजी पटेल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सीमा हिरे, तुकाराम काते यांनी सहभाग घेतला.

या लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, या रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य विभाग, राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून रुग्णालय तातडीने सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यानं सूचना दिल्या आहेत.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, या हॉस्पिटलमध्ये केवळ ईएसआयसीच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मोफत उपचार घेता येईल. तसेच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत रुग्णांना तपासण्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही दिल्या.

सदस्या सीमा हिरे यांनी उपस्थित केलेल्या नाशिक येथील हॉस्पिटल मधील सुविधेसाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची मागणी, विश्व हिंदू परिषदेने गरबा -दांडियामध्ये घातलेल्या मुस्लिम बंदी संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी मुस्लिम द्वेष वाढवणे हा विश्व हिंदू परिषद आणि संघाचा अजेंडा

११ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रमध्ये गरबा- दांडिया खेळामध्ये मुस्लिम युवकांना बंदी घालण्यासंदर्भात विश्व हिंदू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *