ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अधिसूचना जाहिर जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठीचे आरक्षण जाहिर

मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूका आणि त्यावरील अध्यक्ष-उपाध्यक्ष,  सभापती-उपसभापती यांच्या निवडणूका होणार आहेत. या पदासाठी ग्रामविकास विभागाने चक्रकार पद्धतीने सोडत काढत राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष विविध समित्यांचे सभापती आणि पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती पदासाठीचे आरक्षणाची अधिसूचना जारी केली.

अधिसूचनेतील माहितीनुसार सप्टेंबर २०२२ रोजी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणाच्या धोरणानुसार २०२५ च्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदा करिता सध्या लागू असलेल्या आरक्षण कालवधीच्या समाप्तीनंतर लगेच हे नवे आरक्षण लागू होणार आहे. तसेच जि.प अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती उपसभापती पदावर महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तसेच ही प्रत्येक पद हे अडीच वर्षांसाठी राखीव राहणार आहे.

ग्रामविकास विभागाने काढलेली हीच ती आरक्षणाबाबतची अधिसूचना

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *