Tag Archives: reservation

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ? नरेंद्र मोदींनी आधी गुजरातची वाट लावली आणि नंतर देशाला २५ वर्षे मागे नेले, हा वाढदिवस नाही तर ‘काळा दिवस’ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जिवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करा, असे आवाहन भाजपाकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांचा व त्यांच्या पक्षासाठी मोठा असेल पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही फटका बसला आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून MPSC चे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत …

Read More »

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची स्पष्टोक्ती, आरक्षण ही घटनात्मक तरतूद कोणाच्या सांगण्याने ना संपवली ना कोणाला दिली

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणाच्याही मागणीनुसार आरक्षण रद्द केले जाऊ शकत नाही. पिढ्यानपिढ्या सामाजिक भेदभावाला सामोरे गेलेल्या समाजांना पाठिंबा देण्यासाठी हा एक घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना चिराग पासवान यांना, आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याच्या मागणीसाठी जंतर मंतर …

Read More »

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे युजीसीच्या समता नियमनाविरोधात आंदोलन जाती आधारीत आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी

४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचे ठिकाण असलेल्या नवी दिल्लीतील जंतर मंतरवर शुक्रवारी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन झाले, यावेळी अनारक्षित वर्गातील मोठ्या संख्येने आंदोलकांनी हजेरी लावली. प्रामुख्याने ‘उच्च जातीं’तील या आंदोलकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समता नियमांविरोधात निदर्शने केली आणि जाति-आधारित आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी केली. आरक्षण सुधारणा …

Read More »

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती विविध निवेदन, अर्जांवर वाचून निर्णय घेण्यासाठी समिती-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यावर या विषयावर प्राप्त निवेदने, अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी पाटणा उच्च …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का? युसीजीच्या नव्या नियमावरून नोकरदार वर्गाला परखड सवाल

युजीसीच्या (युनियन ग्रॅन्ट कमिशन अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग) नवीन नियमावलीला होत असलेला विरोध आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर, तुम्ही चळवळीसाठी नक्की काय करत आहात? तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यापुरतेच आहात का, अशा कडक शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून X वर पोस्ट करत बहुजन …

Read More »

ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अधिसूचना जाहिर जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठीचे आरक्षण जाहिर

मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूका आणि त्यावरील अध्यक्ष-उपाध्यक्ष,  सभापती-उपसभापती यांच्या निवडणूका होणार आहेत. या पदासाठी ग्रामविकास विभागाने चक्रकार पद्धतीने सोडत काढत …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल  मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर  करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …

Read More »

राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे स्पष्टीकरण, युपीएससीची जाहिरात मागे नोकर भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर युपीएससी जाहिरातही मागे घेतली

केंद्र सरकारने विविध मंत्रालयांमधील रिक्त पदांच्या नोकऱ्यांसाठीची भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर दहा महिन्यांनी, आरक्षण समाविष्ट करण्याच्या धोरणाचा आढावा घेणार असल्याचे सांगून, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, सरकारने त्यांचे पार्श्व प्रवेश धोरण स्थगित केलेले नाही आणि अजूनही “ते खुले आहे”. १७ ऑगस्ट २०२४ …

Read More »

मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे का?,

एखाद्या समाजाचा मुख्यमंत्री राज्याला मिळाले, म्हणजे तो संपूर्ण समाज पुढारलेला कसा ?, मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री राज्याला लाभले म्हणून तो समाज पुढारलेला असल्याचे म्हणता येणार नाही?, असा युक्तिवाद मंगळवारी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच याआधी गठीत केलेल्या आयोगाच्या अहवालात त्रुटी आढळून आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक …

Read More »