चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गुरुवारी केली.

याबाबत आशिष शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली होती. स्वाती म्हसे पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ निर्देश देऊन ही बाब सकारात्मकपणे मार्गी लावली आहे. त्यामुळे महामंडळातील नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान १६८०० तसेच ३० हजार दिवाळी भत्ता, कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना १५ हजार रुपये तसेच महामंडळातर्गत कार्यरत असणाऱ्या एन.डी.स्टुडीओ येथील कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळीनिमित्ताने मिळणार आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यामध्ये आनंदी वातावरण असून सर्वांनी आभार मानले आहेत.

नियमित अधिकारी-कर्मचारी यांच्यासह महामंडळात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचा महामंडळाच्या व्यवसाय विकासात महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदानासह इतर कर्मचाऱ्याना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *