मंत्रालयाला लागून नव्या इमारतीत, बाहेरचे विभाग आणि राज्यमंत्र्यांना मिळाली जागा आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग एकाच इमारतीत, प्रशासकीय कामकाज अधिक सुटसुटीत होणार

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना आणि विभागांना मंत्रालयाच्या मुख्य आणि अनेक्स इमारतीत जागा कमी पडत असल्याने गार्डन गेटजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या एनेक्सी-२ (विस्तारीत-२) इमारत उभारण्यात आली. या इमारतीत जीटी हॉस्पीटल आणि सीएसटी भागात असलेल्या विविध विभागांना आणि मंत्र्यांच्या कार्यालयाना पुन्हा मंत्रालयात आणण्यात आले असून यातील दालने दोन कॅबिनेट, पाच राज्यमंत्री आणि मंत्रालयाच्या बाहेर राहिलेल्या विभागांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारकडून तसे आदेश जारी कऱण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सध्या गोकुलदास तेजपाल (जीटी) रुग्णालय परिसरातून कार्यरत असलेले सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग आता मंत्रालयाच्या या नव्या इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहेत।

या इमारतीच्या भूतळावर प्रवेश लॉबी, स्वागत कक्ष, उपहारगृह आणि विद्युत कक्ष असतील. पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, विकसित महाराष्ट्र सेल, सीएम डॅशबोर्ड आणि इतर प्रशासकीय विभाग असतील. दुसऱ्या मजल्यावर वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, तर तिसऱ्या मजल्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाला जागा देण्यात आली आहे.

चौथ्या मजल्यावर राज्यमंत्री पंकज भोयर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांची कार्यालये असतील, तर पाचव्या मजल्यावर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांची कार्यालये असतील. चौथा आणि पाचवा मजला यावर सामायिक बैठक कक्षही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यांचा वापर सर्व विभागांना आवश्यकतेनुसार करता येईल.

यापूर्वी गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालय परिसरातील नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला होता. वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन ही इमारत भविष्योन्मुख पद्धतीने उभारण्यात येत असून, विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली अधिक कार्यक्षमतेने पार पडेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *