दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी भरपाई मिळवून देण्यासाठी वेदर स्टेशन

फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कृषी मंत्री बोलत होते.या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुढे बोलताना म्हणाले की, डहाणू आणि बोईसर येथील शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरूनही त्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी पालघर यांना करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारण्यासाठी शासन आग्रही आहे. गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल अशी आशाही यावेळी केली.

शेवटी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे कडक निर्देशही यावेळी दिले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद अंतर्गत २०९ कोटींचे वाटप करणार

कोकण विभागातील अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *