Editor

एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे विशेष सखोल मतदार पुनरिक्षण करण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापनासाठी एआय आधारित ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करा एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार

राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व  आपत्ती व्यवस्थापनाबाबत …

Read More »

सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी २५ मे पासून विभागीय परिक्षा महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदासाठी परिक्षा

महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींना संबंधित पदावर कायम करण्यासाठी, तसेच जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावरील पदोन्नती व नामनिर्देशनासाठीच्या विभागीय परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालय (आस्थापना) यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. या परीक्षा दि. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य ओपन ए आय,मेटा, एंथ्रॉपिक आणि क्लाउडगुगल यांसारख्या जागतिक अग्रगण्य ए आय कंपन्यांचा सहभाग

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केलीत्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

छगन भुजबळ यांची माहिती, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना छगन …

Read More »

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका, घरी बोलावून मंत्री केलं ही चूक बच्चू कडू शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने केली टीका

गत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना घरी बोलावत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. तसेच बच्चू कडू यांचा योग्य तो सन्मान राखला असे असतानाही शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री पदाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांची साथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉनची राजधानी पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई ला मागे टाकणार, संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही.  नवीन उद्योग,  तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदींच्या या कृतीमुळे इटलीने पेट्रोल-डिझेलची जहाजे रोखल्याने इंधनाचा तुटवडा भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली

पंतप्रधान मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले ४ जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास ८०० टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून …

Read More »

तीव्र उष्णतेच्या झळांच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि वायव्य भारतावर ढगं होतायत जमा

भारताचा मोठा भाग तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त असताना आणि रात्रीच्या वेळीही तापमान असामान्यपणे जास्त असताना, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या उपग्रह प्रतिमांमधून उत्तर भारताकडे एक मोठी पश्चिमी प्रणाली येत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे बहुप्रतिक्षित पावसाची आणि या भाजून काढणाऱ्या तापमानापासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. INSAT-3DS हवामान उपग्रहाने …

Read More »

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईड हमजा बुरहानची अज्ञाताकडून हत्या गृह मंत्रालयाकडून दहशतवादी म्हणून जाहिर

पाकिस्तानमध्ये पुन्हा अज्ञात व्यक्ती कार्यरत? २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील एका सूत्रधाराला, ज्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले. पुलवामाचा रहिवासी, ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाणारा हमजा बुरहान याला २०२२ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. बुरहान, ज्याचे मूळ नाव …

Read More »