सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी २५ मे पासून विभागीय परिक्षा महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदासाठी परिक्षा

महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींना संबंधित पदावर कायम करण्यासाठी, तसेच जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावरील पदोन्नती व नामनिर्देशनासाठीच्या विभागीय परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालय (आस्थापना) यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. या परीक्षा दि. २५, २६ आणि २७ मे २०२६ रोजी पार पडणार असून, यासाठी नवीन पनवेल येथील एका प्रमुख परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विकास सेवा सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावरील उमेदवारांच्या स्थिरीकरणासाठीची परीक्षा दि. २५, २६ आणि २७ मे २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत घेतली जाईल. याच सोबतीने जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी आणि नामनिर्देशनाव्दारे थेट नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीची विहित परीक्षा दि. २५, २६ आणि २७ मे २०२६ या दोन दिवसांत घेतली जाणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा नवीन पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील “चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय” या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

या सर्व परीक्षांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संबंधित विभागीय आयुक्तांकडे आधीच रवाना करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना काही कारणास्तव अद्याप परीक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त झाले नसेल, त्यांनी विनाविलंब आपल्या संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून ते मिळवून घ्यावे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण तारखांची आणि सूचनांची नोंद घेऊन वेळेत परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे यांनी केले आहे.

About Editor

Check Also

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *