Editor

नीती आयोगाच्या ‘भारतीय नावीन्य निर्देशांक’ मध्ये महाराष्ट्र ४ थ्या स्थानी ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य (Innovation) निर्देशांक २०२१ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा …

Read More »

देशाच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रोपदी मुर्म ३ लाख मतांच्या फरकाने विजयी

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २५ जुलै २०२२ रोजी पूर्ण करत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीसाठी देशात सोमवारी मतदान पार पडले. तसेच आज त्याची मतमोजणी करण्यात आली. रात्री ८.३० वाजेपर्यत मतमोजणी करण्यात आले असता जवळपास द्रोपदी मुर्म यांना ५ लाख ७७ हजार मते पडली. तर …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्या रक्तातच शिवसेना नव्हती…कपाळी गद्दारीचा शिक्का बंडखोरांवर आदित्य ठाकरे यांनी केली टीका

आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांशी …

Read More »

दोन वर्षानंतर गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम कोणत्याही अटीविना पण… गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल

गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई मुंबई आणि नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते. परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया, राहुल हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात …

Read More »

विनायक राऊत यांचा आरोप, त्यांचे पत्र येण्याआधीच लोकसभा सचिवांकडून शेवाळेंची नियुक्ती लोकसभा सचिवांकडून आमच्यावर अन्याय नैसर्गिक न्याय नाकारला

दोन दिवसांपूर्वी आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी लोकसभेतील गटनेते आणि पक्षप्रतोद बदलण्यात आल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून दिले. मात्र शिंदे गटाकडून हे पत्र देण्याआधीच लोकसभा सचिवांकडून दोन दिवस आधीच जारी करण्यात आलेल्या पत्रात राहुल शेवाळे यांची गटनेते पदी निवड करण्यात …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार

मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी ते वांद्रे या सी लिंकची प्रतिकृती असलेला पूल उभारण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे हा पूल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुळगावी असलेल्या ठिकाणाहून जवळच उभारण्यात येणार आहे. तसेच हा पूल …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप

महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …

Read More »

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल …

Read More »

संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने बजावले नवे समन्स २७ तारखेला चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर २० तारखेला ईडी चौकशीसाठी येता नसल्याचे कारण देत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ७ ऑगस्ट नंतरची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र ईडीने संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने त्यांना सुधारीत तारीख दिली मात्र ७ ऑगस्टनंतरची तारीख देण्याऐवजी त्यांना याच महिन्यातील २७ …

Read More »