भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधत राज्याचे नव्याने सांस्कृतिक कार्यमंत्री झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा निर्णय घेत आता आता राज्यातील सर्व शासकिय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी फोनवर बोलताना हॅलो असे बोलून सुरुवात करण्याऐवजी वंदे मातरम …
Read More »खाते वाटपात भाजपाच्या तुलनेत शिंदे गटाला काय मिळाले आणि आणखी काय मिळणार? महत्वाची खाती वगळता तोफेच्या तोंडी शिंदे गटाचे मंत्री
हिंदूत्वाच्या मुद्यावरून आणि आम्हाला चांगली खाती पाहिजेत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत जात राज्यात स्थापन केली. उशीराने का होईना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर या मंत्र्यांना खात्याचे आज वाटपही करण्यात आले. आज झालेल्या खातेवाटपात राज्याच्या दिशाधोरण आणि क्रिमची ओळखली जाणारी महत्वाची खाती …
Read More »वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन
शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड …
Read More »खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे
विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …
Read More »शेअर बाजाराचे बिग बुल झुनझुनवाला यांनी अखेरचा घेतला निरोप; काय आहे पार्श्वभूमी? वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारतीय शेअर बाजार आणि गुतंवणूक क्षेत्रातील बडे प्रस्थ तसेच शेअर मार्केटमध्ये बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतरांकडे ‘ही’ खाती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सहीनंतर जाहीर
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास १३ खाती ठेवण्यात आली आहेत. यापैकी मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही …
Read More »संभाजी राजे यांचा सवाल, मेटेंपर्यत मदत का वेळेत पोहोचली नाही ? मेटेंच्या निधनाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार
मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेणारे आणि त्याचा पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ बीडहून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. मात्र अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकार मेटे कुटुंबियांच्यासोबत
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. अपघातानंतर विनायक मेटे यांना कामोठे येथील एमजीएम येथील रूग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रूग्णालयाला भेट देत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मेटेंच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. …
Read More »विनायक मेटे यांच्या अपघाताची पोलिसांच्या ८ पथकाकडून चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेच पोलिसांची कारवाई
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच …
Read More »शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचे अपघातात निधन; बीडला होणार अंत्यसंस्कार राजकिय आणि मराठा समाजाकडून हळहळ
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ खालापूरचा टोल नाका पार केल्यानंतर हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात पहाटे ५ वाजून ५ वाजता घडला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार राहीला …
Read More »
Marathi e-Batmya