शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या विरोधात ईडीकडून लक्ष्य करत कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकतीच संजय राऊत यांची पत्रावाला चाळ प्रकरणी चौकशी करत मध्यरात्रीनंतर अटक केली. त्या पाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठविल्याचे सांगितले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राऊत कुटुंबियांना सूचक इशारा दिला. संजय राऊत …
Read More »राष्ट्रवादीचा आरोप, मोदी सरकारच्या धोरणामुळे चार महिन्यात १०० अब्ज डॉलरची तूट प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप सूचना मागविण्याची केली मागणी
मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात – निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशा …
Read More »लम्पी त्वचारोगापासून बचावासाठी पशुसंवर्धन विभागाने जारी केल्या ‘या’ सूचना जनावरांतील लम्पी त्वचारोगाबाबत प्रतिबंधात्मक सूचना
गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोगाचा (लम्पी स्किन डिसीज) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही… सोनिया गांधी यांच्या घराभोवती फौजफाटा वाढविला
नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केले. त्याचबरोबर काँग्रेस मुख्यालयाबरोबरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराभोवतीही फौजफाटा वाढविण्यात आला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आव्हान दिले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना …
Read More »संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी; वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
तीन दिवसांपूर्वी पत्रावाला चाळ प्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मैत्री आणि रिसिडन्स गार्डन या दोन बंगल्यावर ईडीने धाडी टाकत ११ लाख रूपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर संजय राऊत यांची ईडीने रात्री उशीरापर्यत चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली.अटके नंतर संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयात …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या सर्व बैठका रद्द, प्रकृती बिघडली डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महाराष्ट्रातील वाढते दौरे, राजकिय मेळावे आणि रात्री उशीरा पर्यंत वाढलेल्या बैठका यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाररीक आणि मानसिक तणाव वाढला. त्यामुळे त्यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व नियोजित शासकिय कार्यक्रम रद्दबातल करण्यात आले. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. …
Read More »नाना पटोले यांची घोषणा, राजभवनाला घेराव घालणार महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार
केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून उद्या शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना वजा आदेश, सध्या निर्णय घेवू नका याचिकेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रवेश -पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार
सर्वोच्च न्यायालयात काल अपुरी राहिलेल्या सुनावणी आज घेण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडताना काही सुधारीत मुद्दे उपस्थित केले. त्यावर उध्दव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. मात्र या याचिकेत निवडणूक आयोगानेचे वकिल अरविंद दातार यांनी आज आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या कामकाजात सर्वोच्च …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश, अंगावर आले तर शिंगावर घ्या उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिस प्रशासनाला निर्देश
काल रात्री उशीरा राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला करत त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आज काही शिवसैनिकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चे दरम्यान शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेतील संख्याही घटविली महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरविला
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली राजकिय ताकद वाढण्यास मदत होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya