बच्चू कडू म्हणाले, शिंदे गटातील ४० आमदार गेले तरी सरकारला धोका नाही भाजपाच्या मदतीने सरकार चालवू

आमचे ४० आमदार परत गेले तरी राज्य सरकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळून सरकार बनवू शकतात, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे, असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला लगावला.

दोनच मंत्र्यांचे असलेले शिंदे -फडणवीस सरकार अपंग असल्याची टीका पटोले यांनी केली होती. दिव्यांगाना कमजोर समजणे हा पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नानांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. मात्र, ते राज्याचा कारभार सांभाळण्यास सक्षम आहे. काही अडचणींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला गेला. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे काहीही नुकसान झालेले नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही पहिला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि मग सरकारच्या, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्यात नियमानुसारच ओला दुष्काळ जाहीर करण्यात येतो. विरोधी पक्षनेते अजित पवारांना याबाबत कल्पना असल्याचे म्हणत बच्चू कडूंनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अजित पवारांनी केली होती. सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली असल्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही. जर सरकारने मदत दिली नाही तर आम्ही सुद्धा सरकारविरोधात आंदोलन करु असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *