Breaking News

आयपीएलसाठी स्टेडियमध्ये ५० टक्के क्षमतेची प्रेक्षकांना परवानगी द्या गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूका जुन्या पध्दतीने घ्या-ॲड आशिष शेलार यांनी केली मागणी

आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉर्न, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत अर्थसंकल्पातील विभागवार चर्चे दरम्यान मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील …

Read More »

अजित पवार यांची मोठी घोषणा, शेतकऱ्याला मिळणारा धान बोनस यंदापासून नाही पण… प्रति एकर मदत विचाराधीन; धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देणार - अजित पवार

शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगतानाच धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शासनाने धान खरेदी …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, सभागृहात १३८ मराठा आमदार, पण त्यांनी बोलायला हवं महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंची फसवणुक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात १३८ मराठा आमदार आहेत. पण ते बोलतच नाहीत. त्यामुळे या आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नी बोलले पाहिजे असे सांगत  महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मराठा आरक्षण …

Read More »

रायगडमधील महामुंबईसाठी घेतलेल्या जमिनीवरील सुनावण्या परत करणार जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार-उद्योग मंत्री

काही वर्षांपूर्वी महामुंबई सेजसाठी रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आलेल्या होत्या. मात्र जनक्षोभाच्या रेट्यापुढे हा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकार आणि रिलायन्स कंपनीवर आली. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा निर्णय झाला असून त्यावर सध्या सुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावण्या कधीपर्यंत संपविणार असा प्रश्न …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केली “ही” अभय योजना ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२’ अभय योजना

कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यातंर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये १० हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ …

Read More »

अजित पवार म्हणाले, सिहांसनाधिष्ठीत पुतळा आहे, काय अभिवादन करायचे ते करा भाजपा आमदार मुनगंटीवारांच्या प्रश्नावरून पवारांनी दिले उत्तर

तिथीनुसार साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित करत नेमकी शिवजयंती कोणत्या तारखेची असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एका पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे …

Read More »

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, शिवजयंती नेमकी कधीची खरी, तारखेची की तिथीची? मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीवरून केला मुद्दा उपस्थित

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे बोलण्यास उभे रहात म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्यात ज्या दिवशीही महापुरूषांची जयंती असले, त्यादिवशी सभागृहात महापुरूषांच्या फोटोची फ्रेम सभागृहात लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार जयंती साजरी करण्यात आली. मात्र आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी …

Read More »

एमआयएम आणि द काश्मीर फाईल्स सिनेमावर शरद पवारांची म्हणाले… राष्ट्रीय समितीने राज्याला अधिकार दिलेले नाहीत

मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाझ जलील यांनी तिन्ही पक्षांना दिल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर एमआयएमसोबत आघाडी शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, …

Read More »

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन वेळा लाट येवून गेली आहे. मात्र हा विषाणू काही केल्या जायला तयार नाही. मात्र या विषाणूपासून बचाव करून घेण्यासाठी विविध लसी बाजारात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रभावी म्हणून …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या मोदी बाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसने दिला “गीता” मधील संदर्भ नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपतात आता झोप येवू नये म्हणून प्रयत्न करतायत

मागील काही महिन्यापासून महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. त्यातच आता भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपत असल्याचे सांगत आता ते झोप येवूच नये यासाठी प्रयत्न करत …

Read More »