राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »संजय राऊत म्हणाले, त्यांची लाकडं रचली श्रीधर पाटणकरांवरील कारवाईवर संजय राऊतांची भाजपावर टीका
मुखमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी या कारवाईवरून भाजपावर …
Read More »आव्हाडांचे ते वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोहच भाजपा आमदार आशिष शेलार यांची टीका
राज्यात ईडीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पुष्पक ग्रुपची संबधित साईबाबा कंपनीची मालमत्ता जप्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या मुलीला इथे महाराष्टात ठेवणार नाही आणि मुलीला इथे नुसतं बोलावले तरी ती आत्महत्या करेल असे वक्तव्य केले. …
Read More »चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर मंत्री बंटी पाटील म्हणाले, भाजपानेच पाठीत खंजीर खुपसला युती असतानाही शिवसेना उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार
शंकर जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निमित्ताने काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपाकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली. यावेळी भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मंत्री सतेज …
Read More »शेलारांच्या हरकतीमुळे अखेर विधानसभा झाली तहकूब, पण अजित पवारांनी दिली ग्वाही मंत्रीच सभागृहात उपस्थित नसल्याने राज्य सरकारवर आली वेळ
विधानसभेत लक्षवेधीला मंत्रीच उपस्थित नसल्याचा मुद्दा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित करत मंत्री सभागृहात हजर नाहीत तर चर्चा कोणाबरोबर करायची असा सवाल करत मंत्री सभागृहात येत नाहीत. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करा अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्ष संजय सिरसाट म्हणाले, सभागृहात मंत्री राजेंद्र शिंगणे आणि राज्यमंत्री संजय बन्सोड …
Read More »फडणवीसांच्या “डंके की चोट”वर जयंत पाटील म्हणाले “फारच बोअर आहे” द काश्मीर फाईल्सवरून जयंत पाटील यांचा चिमटा
द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झालेले असताना या चित्रपटाचे पडसाद अधूनमधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटताना दिसून येत आहे. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांना चिमटे काढल्याचे दृष्य सभागृहात पाह्यला मिळाले. विधानसभेत काही सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चित्रपट बघायला गेला …
Read More »ईडीच्या कारवाईवर संजय राऊत म्हणाले, ही तर राक्षसी हुकूमशाहीची नांदी न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा नाही
राज्यातील महाविकास आघाडीशी संबधित मंत्री, आमदार यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता ईडीने थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच या कारवाईत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने जाहीर केले. ईडीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नातेवाईकावरच थेट …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेव्हण्यावर ईडीचा कारवाई, या गुन्ह्याखाली केली मालमत्ता जप्त ईडी म्हणते ६ कोटींची मालमत्ता जप्तः २०१७ साली झालेल्या गुन्हेप्रकरणी कारवाई
राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील संबध भलतेच ताणले गेल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ सदनिका …
Read More »मंत्री थोरात म्हणाले, आम्ही तुमच्याच अकृषिक कायद्याचे पालन करतोय, पण तुर्तास स्थगिती नोटीशींना दिली अखेर स्थगिती
मुंबई उपनगरातील शेकडो सोसायट्यांना देण्यात आलेल्या अकृषिक करांच्या नोटीसीवरुन विधानसभेत आज जोरदार चर्चा झाल्याचे पहायला मिळाले. मुंबईतील जवळपास सर्वच पक्षातील आमदारांनी याप्रश्नी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अखेर सोसायट्यांना देण्यात आलेल्या अकृषिक करांच्या नोटीसींना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, या कराच्या नियमात बदल …
Read More »घर कामगार महिलाच्या समस्यांसाठी “श्रम सन्मान” २३ मार्च शहिद दिनी होणार आझाद मैदानावर होणार सभा
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ( जी.डी.पी.) ५०% टक्यांची भर घालणा-या असंघटित कामगारां मध्ये सर्वात मोठे प्रमाण घरकाम करणाऱ्या महीलांचे आहे, आपल्या श्रमाचे योग्य मुल्य मागण्याचा त्यांचा लढा गेली चार दशके चालू आहे. आणि आपल्या संघटीत ताकदीने त्यांनी देशभरात कोठेही नसलेला घरेलू कामगार कल्याण मंडळा सारखा स्वतंत्र कायदा महाराष्ट्र राज्यात सन …
Read More »
Marathi e-Batmya