Breaking News

राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारीः इतक्या जागांसाठी निवडणूक नाही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार …

Read More »

RBI ने महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर घातले निर्बंध ग्राहकांना १० हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

मराठी ई-बातम्या टीम भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील अहमदगर येथे असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंध लादले आहेत. यानंतर बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या स्वतःच्या खात्यातून १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. …

Read More »

काँग्रेस प्रवक्ते म्हणाले, आपल्या विद्यार्थ्याची प्रगती पाहून रशियन अध्यक्ष पुतिन खुश असतील कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला? काँग्रेसने केली माहिती उघड

मराठी ई-बातम्या टीम देशातील राजकिय पक्षांना मिळणाऱ्या निधींची माहिती आता निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्यावर्षी भाजपा, आम आदमी पार्टी, काँग्रेस, भाजपाचे मित्रपक्षासह इतरांना किती निधी मिळाला याची सांद्यत माहितीच काँग्रेसने जारी केली असून या रशियात पुतीन यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणाची हुबेहुब प्रतिकृती देशातही राबविण्यात येत …

Read More »

लष्करी शस्त्रे बनवणाऱ्या जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये ३ भारतीय कंपन्या शस्त्रास्त्र विक्रीत अनुक्रमे १.५ टक्के आणि ४ टक्क्यांनी वाढ

मराठी ई-बातम्या टीम लष्करी शस्त्रे बनवणाऱ्या जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये ३ भारतीय कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत भारत वेगाने लष्करी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचा परिणाम म्हणून भारतातील ३ कंपन्यांनी जगातील टॉप १०० कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. स्वीडिश थिंक-टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च …

Read More »

आरक्षणाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे लोक एका विशिष्ट विचारधारेचे ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण राहिले तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करत आहेत- नवाब मलिक यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण राहिले आहे तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करत आहेत. मात्र कुठलंही आरक्षण मग ते एससी, एसटी आणि ओबीसी या आरक्षणाला बाधा येणार नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. …

Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या ठिकाणाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा नगरविकास विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठवला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. येवल्यातील …

Read More »

ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत सफाई कर्मचाऱ्यांना घेणार १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ- शासन निर्णय जारी

मराठी ई-बातम्या टीम ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला. त्याबाबतचा शासन निर्णय आजणसोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवनिर्मिती नगर …

Read More »

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात …

Read More »

ओमायक्रोन विषाणूः आज मुंबईत दोन रूग्ण, संख्या १० वर जोहान्सपबर्ग येथे जावून आलेल्या दोघांना कोरोना

मराठी ई-बातम्या टीम डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काल लगेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रूग्ण आढळून आले. तर आज मुंबईतील दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल हाती आला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोन रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या ३७ वर्षिय व्यक्तीला …

Read More »

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीच्या दरात आणखी घटः असे राहणार दर खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. …

Read More »