मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा …
Read More »ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ अभियान कालावधीत ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) ला ५ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्याचबरोबर राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता …
Read More »पुनावाला म्हणतात, रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही लस पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पुनावाला यांच्याकडून स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी लसींचा पुरवठा करण्यावरून एका राजकिय पक्षाच्या नेत्याकडून धमकीचा फोन आल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी करताच यावरून एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर विविध राजकिय पक्षांनी पुनावाला यांना कोणी फोन केला याचा खुलासा करण्याची मागणी करण्यास सुरु झाली. अखेर याप्रश्नी आपले मौन सोडत रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे …
Read More »याला पुनावाला स्वतः जबाबदार; त्यांना कोण बदनाम करत नाहीय… लसीची आधी जास्त आणि नंतर कमी किंमत करुन जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा विषय ठरतोय-मलिक
मुंबई: प्रतिनिधी केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पिटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन करत पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून …
Read More »प. बंगालमध्ये ज्या पद्धतीने चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या कारनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आज …
Read More »भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी
मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका नाहीतर महागात पडेल असा सज्जड धमकीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका दूरचित्रवाणीवरून दिली. देशातील पाच राज्यांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणूकीच्या निकालावर एका दूरचित्रवाहिनीवर चर्चा सुरु होती. …
Read More »केरळवासियांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास तर पंढरपूर-मंगळवेढ्यात अविश्वास आमचा थोडक्यात पराभव - जयंत पाटील
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३७०० मतांनी पराभव झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाले. मात्र राष्ट्रवादी …
Read More »भाजपाबाबतची शरद पवारांची भविष्यवाणी अखेर झाली खरी तीन राज्यातील दारूण पराभव होणार असल्याचे भाकित
मुंबई: प्रतिनिधी देशातील पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, पाँडीचरी, आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर या पाचही राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार असल्याचे भाकित केले होते. …
Read More »आणि पंतप्रधान मोदींचे ममता बॅनर्जी यांच्याबाबतचे भाकित खरे ठरले पश्चिम बंगालमध्ये तृणमुल आघाडीवर मात्र ममता बॅनर्जी पराभूत
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीची घोषणा सुरु झाल्यानंतर साधारणत: मार्च महिन्याच्या पहिल्या १० दिवसात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारा दरम्यान भाकित केले होते. ते भाकित आज मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या पराभवाने अखेर खरे ठरले. साधारणत: ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमध्ये सभा झाली. …
Read More »
Marathi e-Batmya