Breaking News

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक टन एवढी डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थ्यांना वाटलीच नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? असा सवाल केंद्रीय अन्न धान्य व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. गेल्या वर्षी लॉकडाऊन …

Read More »

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत प्रतिक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे जाहीर केले. लस अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट …

Read More »

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडिसिवर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. …

Read More »

राज्यपाल म्हणाले, संकटावर मात करत राज्याच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारचे कार्य नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या …

Read More »

धनजीशा बोमनजी कूपर ते उद्धव ठाकरे : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वैभवशाली परंपरा ! ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी घेतलेला ६१ वर्षातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा आढावा

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !’ १ मे १९६० या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती …

Read More »

केंद्र मोफत लस देणार म्हणणाऱ्यांनी माहिती तपासून घ्या; १८ ते ४४ ची जबाबदारी राज्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विरोधकांना टोला लगावत ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र काहीजण केंद्र सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याची चुकिची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती तपासून घ्यावी असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावत १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर …

Read More »

परिस्थितीकडे गांभीर्याने पहा न्यायालयाचे केंद्राला आदेश लसीकरणावरून मोदी सरकारला झापलं

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. अस्ट्रा झेनका ही लस अमेरिकेत स्वस्त दरात मिळत असताना त्याच लसीसाठी भारतात मात्र जास्त दराने का घ्यायची? असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला करत कोरोनाचा सामना करण्यासाठी नॅशनल इम्युनेशन प्रोगाम राबवावा आणि याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राष्ट्रवादीचा खारीचा वाटा ; दोन कोटीची मदत… यामध्ये राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या एका महिन्याच्या वेतनाचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही …

Read More »

राज्यात पुन्हा BreakTheChain अंतर्गत १५ दिवसांसाठी कडक निर्बंध १ मे रोजीपासून सकाळी ७ ते १५ मे रोजी सकाळी ७ पर्यत निर्बंध

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजीपासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही राज्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढच होत असल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १ मे पासून १५ मे …

Read More »

गुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात धाव घेतलेले आयपीएस अधिकारी तथा होमगार्डचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल होवू लागल्याने त्यांनी आता पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र यावेळी त्यांनी थेट …

Read More »