Breaking News

नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »

आणि मुख्यमंत्र्यांनी राणेंना करून दिली “त्या” फोनची आठवण जनतेच्या कामासाठी नेहमीच आपण राजकारण विरहीत काम करतो

सिंधुदूर्ग: विशेष प्रतिनिधी राणेंच्या जनादेश यात्रेच्या दरम्यान झालेल्या अटक नाट्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. मात्र या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व सर्वश्रुत आहे. परंतु एका कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन केल्याची आठवण दस्तुरखुद्द …

Read More »

उद्घाटन चिपी विमानतळाचे पण फटाके उडविले राणे आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात रंगला शाब्दीक सामना

सिंधुदूर्ग (चिपी विमानतळ) : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु मंत्री नारायण राणे, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब …

Read More »

सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज

मुंबई: प्रतिनिधी या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत. 1. एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ …

Read More »

ड्रग्ज पार्टीतील कंभोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ताब्यात घेऊन NCB ने का सोडले ? दिल्लीतून भाजप नेत्यांच्या दबावामुळे तिघांना NCB ने सोडले-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते, मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपाचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …

Read More »

कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय …

Read More »

अनुवादकांना संधी: मानधन तत्वावर मिळणार रोजगार भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अनुवादकांनी  आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय …

Read More »

गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली, आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ऐन सणासुदीतही नागरीकांना महाग कर्जच घ्यावे लागणार

मुंबई: प्रतिनिधी गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली.  आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास …

Read More »

विशेष न्यायालयाला सुणावनी घेण्याचा अधिकार: आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला एनसीबीचा युक्तीवाद न्यायालयाने केला मान्य

मुंबई: प्रतिनिधी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर पार्टी करणाऱ्या आर्यन खान यांच्यासह तीन जणांना एनसीबीने अटक केली. मात्र एनसीबीने अटक केल्यानंतर विशेष सेशन न्यायालयासमोर करण्याऐवजी त्यांना किल्ला कोर्टात हजर करत त्यांना एनसीबीची कोठडी सुणावली. त्यानंतर आर्यन खान याला जामीन मिळावा यासाठी त्याच्यावतीने सतीश माने-शिंदे यांनी युक्तीवाद करत आर्यन खान याने अंमली …

Read More »