मुंबई: प्रतिनिधी जीवनविद्या मिशनचे तन-मन-धन यासंदर्भातील शिबिर अत्यंत अभ्यासपूर्ण, माहिती प्रचूर, आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणांना साक्षात जीवंत करणारे असून अशी शिबिरे विदर्भ आणि मराठवाड्यात आयोजित करण्यात आली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित पणे थांबतील, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केले. जीवन विद्या मिशन बोरीवली शाखेच्या …
Read More »राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजाराची मदत जाहीर बागायतदारांना १८ हजार रूपयांची मदत
मुंबईः प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वाऱ्यावर असल्याची टीका सर्वच पक्षांकडून होवू लागली. याची गंभीर दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून हेक्टरी ८ हजाराची तर बागातयतदारांना १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किमान २ हेक्टर …
Read More »अयोथ्येतील राम मंदीर आणि मस्जिदीसाठी १ लाख ११ हजाराची देणगी अध्यक्ष परवेज अली सय्यद यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वादग्रस्त अयोध्या येथील बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ नाहीशी झाली. त्यामुळे राम मंदीर उभारणीसाठी अल्पसंख्याक कल्याणकारी समितीकडून १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिल्याची माहिती परवेज अली सय्यद यांनी दिली. या निकालामुळे संपूर्ण देशातील हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली कटुता …
Read More »नवाब मलिक म्हणतात राऊतांना, ही तर आता प्रेमाची सुरुवात शिवसेनेच्या राऊतांच्या शेर ला राष्ट्रवादीच्या नवाब यांचा मीर च्या शायरीने उत्तर
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा आघाडीखालील सरकारच्या स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटाघाटी सुरु आहेत. या आघाडीसाठी वातावरण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्टिटरवरून शेर-शायरी करत आहेत. मात्र राऊतांच्या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच प्रतित्तुर देत ही तर प्रेमाची सुरुवात असून …
Read More »राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळलं आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीजींची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच दिल्लीवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या …
Read More »शिकाँराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान केव्हाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची सोमवारी बैठक
नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील किमान सामायिक कार्यक्रमावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्ली येथे जाणार असून त्यानंतर १९ ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशीचे दिले आदेश काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा माहिती
मुंबई: प्रतिनिधी राफेल प्रकरणात यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरुण शौरी या नेत्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली असून त्यासंदर्भात पूर्ण निकालाचे वाचन न करता मोदी सरकारला पुन्हा एकदा क्लीन चीट दिल्याचे चित्र उभा केले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तपशिलात जाऊन वाचन केल्यास मोदी …
Read More »सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात …
Read More »शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्थमंत्रालयाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे आश्वासन
नागपूर: प्रतिनिधी नागपुर आणि इतर जिल्हयात अतिवृष्टीमुळे संत्र्यांसह इतर पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले असून संसदेच्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राच्या कृषी मंत्रालयात बैठक घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. विदर्भातील दोन दिवसीय दोऱ्यानंतर नागपूरात आयोजित करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya