मुंबई: प्रतिनिधी नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील …
Read More »१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतरही काही करता येणार नसेल तर बांगड्या भरा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका
श्रीगोंदाः प्रतिनिधी १३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर त्यांनी एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचारार्थ जाहीर सभेत ते श्रीगोंदा येथे बोलत होते. काय करायचं आता… काही कामच नाही म्हणतात… …
Read More »मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणा-या मंत्री लोणीकरांची उमेदवारी रद्द करा काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले. तसेच मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत असल्याचे …
Read More »विखे-पाटलांच्या भूमिकेमुळे १ लाख झोपडीधारक घरांपासून वंचित (भाग-१) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्याचे वाटप होवूनही झोपडीधारक बेघरच
मुंबईः विशेष प्रतिनिधी सांताक्रुज येथील विमानतळाच्या जमिनीवरील १ लाख झोपडीधारकांच्या पुर्नवसनासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पातील घरांचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधक तत्वावर करण्यात आले. मात्र याच प्रकल्पासंदर्भात एसआरएबरोबर करण्यात आलेला जीव्हीकेबरोबरील करार रद्द करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्याने १ लाख झोपडीधारक घरांपासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक …
Read More »राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीपूर्वीच वेतन मुख्य सचिवांचे संघटनेला आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असल्याने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि शिक्षकांना वेतन देणार नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र याप्रश्नी सरकारी कर्मचारी संघटनेने कठोर भूमिका घेत पगार दिवाळीपूर्वीच मिळावी अशी मागणी केली. या मागणीला राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत …
Read More »३५० एकर मिठागरांची जमिन आता लवकरच खुली होणार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुंबईः खास प्रतिनिधी सर्वांसाठी घरे या योजनेसाठी मुंबईतील एक हजार एकरहून अधिक असलेली मिठागरांची जमिन उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र त्यास तब्बल तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर राज्य सरकारला जाग आलेली असून ऐन निवडणूकीच्या धामधुमित ही जमिन खुली करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या …
Read More »भाजपाने २०१९ च्या संकल्प पत्र जाहीर करताना २०१४ चा जाहीरनामा वाचायला हवा होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »मुख्यमंत्री म्हणतात इथे निवडणूक नाही..मग पंतप्रधान-गृहमंत्री कशाला येतायत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल
अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा …
Read More »शिवाजी महाराज स्मारक, डॉ.आंबेडकर स्मारक आगामी पाच वर्षात पूर्ण करण्याचा भाजपाचा संकल्प आगामी पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून जाण्याचा भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचा विश्वास
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची …
Read More »राहुल गांधींच्या “७० साल” वाला काटछाट व्हिडिओप्रकरणी सायबर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता शेअर
मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीचा फायदा उठवित भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मूळ व्हीडीओत काटछाट करत चुकीचा व्हीडीओ व्हायरल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी शेअर केला. तसेच या काटछाट केलेल्या व्हीडीओचा वापर राजकिय कारणासाठी केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ४० सेंकदाच्या …
Read More »
Marathi e-Batmya