मुंबईः विशेष प्रतिनिधी शुक्रवारी रात्रीपर्यंत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर रात्री उशीराने वेगळाच रंगत भल्या पहाटे ५.४५ वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा शपथविधी झाल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्राला पाह्यला मिळाले. शिकाँराच्या …
Read More »ठाकरे घराण्याचा रिमोट कंट्रोल संपुष्टात, आता थेट मुख्यमंत्री पदच शरद पवारांच्या भूमिकेने शिवसेनेची परंपरा खंडीत होणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ताकारणाच्या खेळात आतापर्यंत रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकिय सोंगट्या हलविणाऱ्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून कात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेना सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती आता थेट मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेने …
Read More »शिकाँराच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेची निश्चिती झाली असून या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे राहणार आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सहमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. वरळी येथील नेहरू सेंटर येथील एका पंचतारांकित …
Read More »मराठी e-बातम्या संकेतस्थळाच्या वृत्ताची राज्यपालांकडून दखल राज्याच्या कारभाराची सर्व सुत्रे आता राज्यपालांच्या हाती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्र्यांच्या आणि प्रशासकिय अधिकारांचे वाटप करणे गरजेचे असते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या अधिकारांचे वाटप १० दिवस झाले तरी केले नसल्याची बाब मराठीe-बातम्या.कॉम या संकेतस्थळाने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेतली. तसेच राज्यपालांनी दोन दिवसात अधिकारांचे वाटप करणारा आदेश जारी केला. …
Read More »भाजपा वगळून सत्ता स्थापन करण्याची काँ-राच्या मित्रपक्षांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीची बैठक संपन्न
मुंबईः प्रतिनिधी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या …
Read More »सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य …
Read More »२०१४ साली संख्याबळाची माहिती न देताच फडणवीस सरकार स्थापन माहिती अधिकारात उघडकीस
मुंबईः प्रतिनिधी गतवेळी अर्थात २०१४ साली विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर राज्यात स्थापन करताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना संख्याबळाची कोणतीही माहिती दिली नव्हती. तरीही त्यांनी विधिमंडळात बहुमत सिध्द केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली. आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहेत. पण …
Read More »शिकाँरासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी लवकरच शिवसेनेशी चर्चा करणार राष्ट्रवादीच्या साक्षीने काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासंदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाली आहे. या चर्चेची माहिती लवकरच आघाडीतील घटकपक्षांना देण्यात येणार असून त्यानंतर लवकरच पुढील चर्चा शिवसेनेशी करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नवी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीमधील चर्चेची शेवटची फेरी …
Read More »मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीसाठी आता जीवनदायी भवनात अर्ज करा पर्यायी वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली असून गरजू रूग्णांनी त्यासाठी वरळी नाका येथील जीवनदायी भवनातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयात करण्याचे आवाहन राज्यपालांच्या आदेशान्वये प्रशासनाने केले …
Read More »रायगडच्या कुमार अक्षय ष्ण्मुगम स्ट्रॉगमॅन सलग दुसऱ्यांदा किताब ५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १ कास्ये मिळून १७ पदकांचे अभुतपुर्व आणि घवघवीत यश
मुंबई: प्रतिनिधी राज्य पॉवरलिप्टींग संघटना आणि गिरणी कामगार क्रिडा भवन, परळ यांच्या संयुक्तपणे रविवार दिनांक 2 व 3 नोव्हेंबर,2019 रोजी राज्यस्तरीय इंक्विप(साधनसहित) आणि अनइंक्विप (साधनविरहित) बेंचप्रेस पॉवरलिप्टींग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत रायगड जिल्हयाचा कुमार अक्षय ष्ण्मुगम “सिनियर स्टेट अनइंक्विप स्ट्र्रॉगमॅन बेन्चप्रेस” किताबाचा मानकरी ठरला, कुमार अक्षयने सलग …
Read More »
Marathi e-Batmya