महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने- एमपीएससी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन १४ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एमपीएससी आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात (क्र. ०११/२०२६) …
Read More »राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह १ ते ८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेला सक्रिय प्रोत्साहन देत १ ते ८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर “संकल्प सप्ताह” प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध, तपासणी व जनजागृतीला अधिक गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे …
Read More »फार्मर आयडी; २० मे पूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता २० मे २०२६ पूर्वी आपला फार्मर …
Read More »अखेर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब अर्ज भरण्यास अवघा एक तासाचा अवधी शिल्लक राहिल्यानंतर अंबादान दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. मात्र महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तसेच त्यांनी स्वतः ऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून याबाबत …
Read More »भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश मुंबई उपनगर प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक
मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समिती अध्यक्ष सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्राणी निवारा उभारणीसाठी योग्य जमिनीची सर्व संबंधित विभागानी संयुक्त पाहणी करून सर्वसमावेशक अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश समिती अध्यक्ष काकडे यांनी बैठकीत दिले. बैठकीस …
Read More »राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री करणार दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन; · ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात जिल्ह्यांमध्ये एमआरआय सेवा सुरू करण्यात येत असून ११ जिल्ह्यांमध्ये डायलिसीस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. या सर्व सेवांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण व …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा निर्णय आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० प्रयोगशाळांपैकी अधिकच्या महाराष्ट्राला देण्याची केंद्राकडे मागणी
राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या संदर्भात १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत …
Read More »विधान परिषदेची आमदारकी- बच्चू कडू थेट शिंदे शिवसेनेत दाखल प्रहार संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व, विधान परिषदेसाठी बच्चू कडू, नीलम गोऱ्हे यांना संधी
मागील काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्याच्या काही वेळ आधी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू …
Read More »‘बार्टी’ ‘कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना आर्थिक साहाय्य प्रति विद्यार्थी २५ हजारांचे मिळणार अर्थसहाय्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी संस्थेच्या यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात …
Read More »महाडायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण किडनी विकारग्रस्तांना दिलासा, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार लोकार्पण
ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलिसीस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा …
Read More »
Marathi e-Batmya