Breaking News

गिरीष महाजन यांची माहिती, अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,नागरिकांनी सतर्क रहावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन

राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले. विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्यासारख्या घटना …

Read More »

इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान, वाहन चालकांची निदर्शने वाहन चालकांकडून जंतरमंतर वर निदर्शने

‘राष्ट्रीय इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमा’ची (National Ethanol Blending Programme) घाईघाईने केलेली अंमलबजावणी आणि त्यामुळे होणारे नुकसान यांविरोधात निषेध करण्यासाठी रविवारी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर वाहनमालक एकत्र आले. सोशल मीडियावर यापूर्वी मांडले गेलेले मुद्देच येथे प्रत्यक्षरीत्या ऐकायला मिळाले. E20 इंधनाच्या अनिवार्य वापराच्या निर्णयाविरुद्ध भारतात झालेला हा पहिलाच प्रत्यक्ष (ऑन-ग्राउंड) निषेध होता. वाहनचालकांनी …

Read More »

सीजेपी अभिजीत दिपके यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, किती काळ दुर्लक्ष करणार? धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरा

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. जंतर मंतर येथील गटाच्या आंदोलनावर मोदींनी मौन बाळगावे आणि परीक्षेचे पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दोन पानी पत्रात सीजेपीचे अभिजीत दिपके …

Read More »

कुर्ला पश्चिमेच्या नौपाड्यात झाड कोसळून अंगावर पडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू अंगावर झाड पडल्याने ६३ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला, जेव्हा एक झाड अंगावर कोसळल्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना दुपारी १२.४० च्या सुमारास कुर्ला पश्चिमच्या नौपाडा परिसरात घडली, जिथे युनूस कुंडावाला यांच्यावर झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, प्रशासन एमएसीसीआयएच्या संकल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे ३६ जिल्ह्यांत ३६ हजार ग्रामीण उद्योजक १.४४ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) ने राज्याच्या ग्रामीण आर्थिक लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘गाव तिथे उद्योजक’ मोहिमेची अधिकृत घोषणा केली आहे. एका भव्य पदग्रहण समारंभात (४ जुलै रोजी) ही घोषणा करण्यात आली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित एमएसीसीआयए MACCIA अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्याकडे …

Read More »

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाचे नियोजन

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स, आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून लाखो वारकरी भाविकांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, सोमनाथ मंदिर आस्थेच्या केंद्रासोबतच राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक 'सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे' उपक्रमास प्रारंभ

सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची १००० वर्षे’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमास मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून रेल्वेमार्गे प्रारंभ झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सहभागी नागरिकांशी संवाद …

Read More »

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश, बाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर अहवाल सादर करा १५ जुलै पर्यंत आढावा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अध्यक्ष यांना बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन १५ जुलै, २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाने स्पष्ट केले आहे …

Read More »

प्रताप सरनाईक यांची ग्वाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शिक्षणप्रवासासाठी एसटी कटिबद्ध दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळाचे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …

Read More »