Breaking News

महिला कर्करोगग्रस्तांसाठी आनंदाची बातमीः आता कर्करोगावर वर्षभरात लस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा

देशात कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषतः महिलांमधील कर्करोग आजाराचे प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी लसीची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे कॅन्सरची लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली असून ही लस ९ ते …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ऑनलाईन सोडत ‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून अभिनंदन

सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. आरोग्य संस्थामध्ये निर्माण होणार दोन हजार पद निर्मिती

राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »

काँग्रेसच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच, थेट तारीख १९ मार्चला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड समितीतप्रकरणी दाखल केली होती याचिका

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची मुदत संपल्याने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच संध्याकाळीच निवड समितीची बैठक पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. निवड समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. मात्र यासंदर्भातील …

Read More »

आंबेगावातील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक …

Read More »

मग सत्ताधारी निवडणूक आयोगावर प्रभाव टाकेल, महुआ मोईत्रा यांची याचिका तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, २०२३ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त (ECs) नियुक्त करणाऱ्या निवड समितीमधून काढून टाकले त्याच्या विरोधात ही याचिका महुआ मोईत्रा यांनी दाखल केली. हस्तक्षेपाची मागणी करत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई या संस्थेच्या मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला. मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

किल्ले शिवनेरी शिवजन्मोत्सव सोहळाः मुख्यमंत्री म्हणाले, गड किल्ले मंदिरापेक्षाही मोठे राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास …

Read More »