सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लवकरच कंपन्यांसाठी पध्दत नियम सुलभ करण्यासाठी एक्सचेंजेससह सिंगल कॉर्पोरेट फाइलिंगची प्रणाली आणेल, असे तिचे अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी सांगितले. “हे एक काम प्रगतीपथावर आहे. तुम्ही तुमचा खुलासा एका एक्सचेंजमध्ये दाखल केल्यास, ते इतर एक्सचेंजच्या वेबसाइटवर आपोआप पॉप्युलेट होईल. ही एक साधी सामग्री …
Read More »जेएसडब्लूचा आयपीओ सेबीने रोखला रोखून धरण्याचे कारण स्पष्ट नाही
भांडवली बाजार नियामक सेबीने JSW सिमेंटची प्रस्तावित रु. ४,००० कोटी रुपयांची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO रोखून धरली आहे. कारणे स्पष्ट न करता, सेबी SEBI ने २ सप्टेंबर रोजी त्यांच्या वेबसाइटवरील अद्यतनानुसार “निरीक्षण जारी करणे (केले आहे) स्थगित ठेवण्यात आले आहे” असे सांगितले. वैविध्यपूर्ण जेएसडब्लू JSW समूहाचा भाग असलेल्या …
Read More »सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना आयसीआयसीआय बँकेकडून पगार काँग्रेसचा प्रवक्ते पवन खेरा यांचा आरोप
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना आयसीआयसीआय बँकेकडून पगार मिळत होता असा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच यासंदर्भात काँग्रेसने थेट माधबी पुरी बुच यांना ट्विटरवरून जाहीर प्रश्न केले. दरम्यान आयसीआयसीआय ICICI बँकेने २ सप्टेंबर रोजी सेबी SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांना पगार किंवा …
Read More »२७ वी ई-गव्हर्नन्सविषयक राष्ट्रीय परिषद मुंबईत दोन दिवस चालणार राष्ट्रीय परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबई येथे प्रारंभ होत आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने ३ …
Read More »कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य वाटप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
सन २०२३ खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४ हजार १९४.६८ कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबरपासून अर्थ सहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री …
Read More »उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयाने सामुदायिक आरोग्य शिबिरे २५ हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लक्ष नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण …
Read More »ठाणे मध्ये विविध समाजासाठी एकाच इमारतीत १२ समाज भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन
एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमीपूजन समारंभात केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना
मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या ३०९ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च रुपये १८ हजार ०३६ कोटी असून, तो सन २०२८-२९ …
Read More »पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीतील विसंगती दूर करणार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. कुक्कुट पालकांच्या विविध मागण्याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »नारायण राणे यांचा आरोप, दंगली घडवण्याचे उबाठा चे कारस्थान शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करणा-यांना जनता जागा दाखवेल
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोमवारी जोरदार हल्ला चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ. …
Read More »
Marathi e-Batmya