मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. पुतळा कोसळून महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या युती सरकार विरोधात महाविकास आघाडी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »‘म्हाडा’ च्या सोडतीतील ३७० सदनिकांच्या किंमतीत १० ते २५ टक्क्यांची कपात अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
‘म्हाडा’ च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. म्हाडाच्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मग लाडकी बहिण योजना थांबवावी का? की त्या जागेवर उभारलेली इमारत नेस्नाभूत करावी
राज्य सरकारने पुण्यातील विकास कामांसाठी १९६३ साली जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र तेव्हापासून जमिन मालकाला जमिन अधिग्रहणाची नुकसान भरपाई दिलेली नाही. एकाबाजूला राज्य सरकारकडे अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई देण्यास पैसे नाहीत मात्र लाडकी बहिण योजनेतंर्गत पैसे वाटपासाठी पैसे आहेत, मग आम्ही लाडकी बहिण योजना थांबवावी की अधिग्रहीत केलेल्या जमिनीवरील बांधकाम पाडावे …
Read More »इस्त्रायलच्या सहयोगातून अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान
जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत …
Read More »राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची तातडीने घोषणा येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणार-पत्रकार परिषदेत माहिती
मालवण येथील राजकोट येथील ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमधील राड्यानंतर मुंबई शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने बैठक घेत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या तिन्ही नेत्यांनी शिवप्रेमीकडून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा …
Read More »शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, या पुतळ्याचे टेंडर न काढता त्यालाच कसे कंत्राट मिळाले? आपटे कोणी शोधला? नेव्हीला त्याची माहिती कोणी दिली? तो कल्याणचाच कसा?
मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उबाठा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना जयंत पाटील …
Read More »निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती, एनपीएसपासून माघार नाही पण युपीएस अधिक… युपीएस पेन्शन योजना अधिक फायद्याची
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱी-कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना लागू केली. या योजनेसंदर्भात बोलताना एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन पासून सरकारने माघार घेतली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी सुधारीत युनिफाईड योजना आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन …
Read More »जुनी गाडी स्क्रॅप करा आणि नवे वाहन घेताना सवलत मिळवा परिवहन विभागाकडून योजना सुरु करण्याबाबत गंभीर विचार
अनेक वर्षांच्या विचार आणि चर्चेनंतर, केंद्र सरकार आणि ऑटोमोबाईल उद्योग स्क्रॅपिंग प्रमाणपत्रावर नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सवलत देण्याच्या अटींवर आली आहे. सणासुदीच्या आधी या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या …
Read More »निर्मला सीतारामन घोषणा, ३० मिलियन जनधन खाती उघडणार जनधन खाते योजनेचा १० व्या वर्धापन दिन
प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (PMJDY) १० व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की २०२४-२५ मध्ये ३० दशलक्ष नवीन प्रधानमंत्री जनधन PMJDY खाती उघडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पत्रकारांना माहिती देताना, सीतारामन यांनी सांगितले की, १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत, एक दशकापूर्वी योजना सुरू झाल्यापासून एकूण ५३१.३ दशलक्ष जन-धन …
Read More »
Marathi e-Batmya