रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी सांगितले की, चलनवाढीविरुद्धच्या लढाईत या टप्प्यावर कोणतीही डगमगता किंवा विचलित होऊ शकत नाही, दोन चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) सदस्यांनी दर कपात करण्याच्या आवाहनानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांनी असेही जोडले की भारत सातत्यपूर्ण पद्धतीने ८ टक्के जीडीपी वाढीच्या दिशेने वाटचाल करत …
Read More »आता आयआरसीटीसीची अॅपवरून एका अकाऊंटवरून दरमहा इतकी तिकिटे काढू शकता रेल्वे मंत्रालयाने केला दिली माहिती
रेल्वे मंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे की आयआरसीटीसी IRCTC खातेधारक भिन्न आडनावे असलेल्या इतर लोकांसाठी ई-तिकीट बुक करू शकतात, अशा प्रकारे भिन्न आडनावांमुळे विद्यमान निर्बंधांबद्दलचे दावे ऑनलाइन रद्द करण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेच्या मते, मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसाठी वैयक्तिक वापरकर्ता आयडी वापरून तिकिटे बुक केली जाऊ शकतात. आयआरसीटीसी खातेधारक भिन्न …
Read More »भारत अमेरिका संरक्षण विषयक करार, आर्थिक समृध्दीच्या दृष्टीने वाटचाल
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (AMCHAM) च्या म्हणण्यानुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण युतीमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सहकारी प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणारी ही भागीदारी दोन्ही राष्ट्रांसाठी जागतिक सुरक्षा आणि आर्थिक समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. AMCHAM चा अहवाल, “यूएस-भारत संरक्षण भागीदारी: सह-उत्पादन आणि सह-विकास,” असे दिसून आले आहे की …
Read More »यंदाचा अर्थसंकल्पातून निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गायब होणार ? लोकसभेच्या चालू अधिवेशनात मांडणार अर्थसंकल्प
या जुलैमध्ये सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विशिष्ट निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट न ठरवून फेब्रुवारीमध्ये शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर केलेला दृष्टिकोन सुरू ठेवण्याची केंद्राची योजना आहे. त्याऐवजी, निर्गुंतवणूक भांडवली प्राप्ती अंतर्गत वर्गीकृत केली जाईल, जसे की या वर्षाच्या सुरुवातीला होते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही आधीच निर्गुंतवणुकीचे धोरण बदलले आहे. उद्दिष्ट सोडून …
Read More »बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाचा विरोध आदित्य ठाकरे यांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र
मुंबईतील मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसकडून दर भाडेवाढीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या अनुषंगाने बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाने विरोध केला असून मुंबईतील बस सेवा पुन्हा एकदा कोलमडून पडण्याच्या स्थिती असल्याचे सांगत मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि बेस्टला आर्थिक निधी द्यावा यासाठी शिवेसना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा
राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. तसेच खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या …
Read More »असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन भाजपा सदस्यांच्या गदारोळानंतर घोषणा लोकसभेच्या कामकाजातून हटविली
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, NEET घोटाळा हा केंद्रपुरस्कृत NEET-UG पेपर फुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर साधला निशाणा
मागील काही दिवसांपासून NEET-UG परिक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कवरून संपूर्ण देशभरातच केंद्र सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आहे. तसेच NEET-UG परिक्षा प्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीचे पडसात सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाईच पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांना १० लाखांची मदत सुपूर्द
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या …
Read More »अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे के सुरेश लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावरून तिढा कायम बऱ्याच वर्षानंतर पदासाठी निवडणूक
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला लोकसभा सभागृहाचे उपाध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शविली तर सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारा पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दाखविली होती. मात्र भाजपा प्रणित एनडीएने उपाध्यक्ष पद देण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इंडिया आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी के सुरेश यांना उमेदवारी जाहिर केली. तर भाजपाकडून अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya