अभिनेते मोहन जोशी यांची दांडी गुल नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उत्सुकता वाढली

मुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पड़घम वाजु लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाट्यकर्मिंची यादी जाहिर झाली आहे. या यादीत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज अपात्र ठरल्याने या निवडणुकीतून त्यांची दांडी गुल झाली आहे.

मुंबई विभागातुन एकूण ३६ जणांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी मोहन जोशी यांच्यासह तुषार दळवी, सुनील तावड़े व अशोक शिंदे यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. मोहन जोशी आपल्या कार्यकाळात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले होते. या निवडणुकीतही ते पुन्हा धमाल करत अध्यक्षपदावर आपली दावेदारी सिद्ध करतील अशी आशा होती, पण अर्ज अपात्र ठरल्याने सर्व समीकरणच बदलली आहेत. आता पुढील पाच वर्षासाठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पड़ते त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *