लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बुधवारी नाशिक दौऱ्यावर संगठन सृजन अभियान शिबिराच्या सांगता समारोहाला उपस्थित राहणार, आदिवासी शिष्टमंडळाशी संवाद साधणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक येथील MTDC रिसॉर्टमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्ट पासून सुरु आहे. बुधवार २ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटाचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, रेहाना चिश्ती, डॉ. विश्वजित कदम, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित असतील.

राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शिबिराला उपस्थित राहून जिल्हा अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत तसेच जागतिक राजकारण व भारत या विषयावर राहुल गांधी भाषण करतील, यावेळी ते आदिवासी शिष्टमंडळाशी तसेच राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील व संध्याकाळी दिल्लीला प्रयाण करतील.

About Editor

Check Also

पुण्यात भाजपा कार्यकारणीची बैठक, पण चर्चा विरोधातील काँग्रेसच्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, भाजपा कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे

काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *