मराठी ई-बातम्या टीम
ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
कथ्थक नृत्यातील त्यांच्या कलासाधनेमुळे पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांच्या नृत्यातील विशारदेमुळे त्यांना पंडित आणि महाराज अशी उपाधी कथ्थक नृत्य चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना बहाल केली होती.
काल रात्री जेवण केल्यानंतर ते आपल्या नातवासोबत अंताक्षरी खेळत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना मृच्छा आली. त्यामुळे त्यांना काल रूग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्यांना रूग्णालयातच मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. साधारणत: रात्री १२.१५ ते १२.३० च्या वाजण्याच्या सुमारात सदरची घटना घडली. ते हृदयविकाराच्या आजारानेग्रस्त होते. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पंडितजींचे निधन झाल्याचे त्यांची नात आणि कथ्थक नृत्यांगणा रागिणी यांनी सांगितले.
सदरची घटना घडली त्यावेळी त्यांचे दोन शिष्य आणि मी व माझी लहान बहीण यशवर्धिनी घरी होतो. त्यांच्या या घटनेच्यावेळी ते हसत होते आणि स्मित करत होते असेही त्यांनी सांगितले.
अति कथ्थक नृत्यामुळे त्यांच्या किडनीच्या आजाराने गाठले होते. तसेच ते डायलिसीसवर होते अशी माहितीही त्यांनी दिली.
पंडित बिरजू महाराज हे फक्त नृत्यात विशारद नव्हते तर ते चांगले वादकही होते. ते नाल आणि तबला वाद्यासह अनेक प्रकारची वाद्य वाजविण्यातही तरबेज होते. तसेच त्यांना गायनाची कलाही अवगत होती. खासकरून ठुमरी, दादरा, भजन आणि गजल गाण्यावरही त्यांची कमांड होती.
पंडीत बिरजू महाराज यांनी फक्त आपल्या कला फक्त स्टेजवरच सादर केली नाही. तर त्यांची नृत्यशैली पाहून त्याकाळी मुघल ए-आझम चित्रपटाचे दिग्दर्शन के.आसिफ यांनी प्यार किया तो डरना क्या गाण्यात त्यांच्या नृत्याचा सीनही समाविष्ट केला. त्यांचे त्या गाण्यातील नृत्य पाहून अनेकवेळा चित्रपटातील मधुबाला आणि दिलीपकुमार यांचा अभियन विसारायला होण्याचा अनुभव अनेक रसिक प्रेक्षकांनी घेतला आहे.
पंडित बिरजू महाराज यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट कलावंताना चित्रपटातील नृत्यासाठी मार्गदर्शन केले. कमल हसन यांच्या दशावतरम हा चित्रपटातील कमल हसन यांना एका गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शनही केले होते.
Marathi e-Batmya