फिल्मीनामा

भाऊ कदम बनणार ‘नशीबवान’ पिफ मध्ये बघायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी लेखक उदय प्रकाश यांनी कॅमेरामन-दिग्दर्शक अमोल गोळेवर केलेल्या कथा चोरीच्या आरोपांमुळे अचानकपणे प्रकाशझोतात आलेला ‘नशीबवान’ हा मराठी सिनेमा आज केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दिल्ली की दीवार’ या आपल्या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’च्या लेखनाचं श्रेय न दिल्याने उदय प्रकाश नाराज झाले आहेत. …

Read More »

पिफमध्ये ‘व्हिडिओ पार्लर’ बालपणाची आठवण जागविणारा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी आपलाही सिनेमा देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये दाखवला जावा… आपल्या कामाचंही जाणकारांनी कौतुक करावं… आपल्या सिनेमावरही पारितोषिकांचा वर्षाव व्हावा… असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असतं. केवळ स्वप्न न पाहता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिग्दर्शकांची दखल चित्रपट महोत्सवांमध्ये नेहमीच घेतली जाते. पिफ म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ख्याती असलेला …

Read More »

‘असेही एकदा व्हावे’म्हणत प्रथमच एकत्र आले उमेश-तेजश्री

मुंबई : प्रतिनिधी मराठी प्रेक्षकांना लवकरच आणखी एक नवी कोरी जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटसृष्टी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता उमेश कामत यांची प्रथमच जोडी जमली आहे. ‘असेही एकदा व्हावे’असंच काहीसं म्हणत उमेश आणि तेजश्री एकत्र …

Read More »

उल्का-गणेश नव्या जोडीचा ‘ओढ’ १९ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी ‘झांसी की रानी’ या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री उल्का गुप्ताची पावलं आता मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहेत. पदार्पणातच मुख्य भूमिका साकारत उल्का रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. पी. प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या …

Read More »

चित्रपटाच्या नफ्यातून उभारणार दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा निर्धार

मुंबई : संजय घावरे नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातही चांगलंच ज्ञात आहे. आजवर लाखों रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन करून त्यांची नेत्रज्योत पुर्नप्रज्ज्वलीत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांचं जीवनचरित्र ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाद्वारे लवकरच येणार आहे. समाजसेवी …

Read More »

प्रियांकाचा मराठी ‘फायरब्रँड’ तिसऱ्या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडपासून हॉलिवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील ‘फायरब्रँड’ बनली आहे. असं असलं तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीकडे मात्र पाठ फिरवलेली नाही. जागतिक पातळीवरील चित्रपटांमध्ये अभिनय करतानाच प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रियांकाने आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सहकार्याने मराठी, पंजाबी, …

Read More »

गान कोकिळेला सांगितिक मानवंदना १४ जानेवारीला होणार कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेल्या व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतातील अनमोल रत्नच आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचं मोजमाप कोणत्याही परिमाणात करणं शक्य नाही. गानकोकिळा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनीही भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत …

Read More »

कुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’ कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा 'विच्छा माझी पुरी करा' ने शुभारंभ

मुंबईः प्रतिनिधी राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा‘ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. कै. वसंत सबनीस लिखित आणि कै. दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा …

Read More »

वैभव बनला स्वामी देवा शप्पथ मालिकेत पाहयला मिळणार

मुंबईः प्रतिनिधी विनोदी अभिनेता अशी ख्याती असलेल्या वैभव मांगलेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. केवळ विनोदी भूमिका न साकारता विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याकडे त्याच नेहमी कल असतो. याच कारणामुळे तो कधी हसवतो तर कधी रडवतो. इतकंच नव्हे तर वैभवचा खलनायकी रंगही प्रेक्षकांनी पाहिला आहे. हाच वैभव आता स्वामीच्या भूमिकेत समोर …

Read More »

वेडा-बी.एफ. चित्रपटात अल्ताफ राजाची पहिल्यांदाच मराठीत कव्वाली १९ जानेवारीला ऐकायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. याद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवरही प्रभावीपणे भाष्य केले जाते. वेडा या आागामी मराठी चित्रपटाद्वारे असाच काहीसा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्य टिकून राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर सारख्या छोट्या गावातील अल्ताफ दादासाहेब शेख यांनी वेडा – बी.एफ. नावाच्या …

Read More »