रणवीर-दीपिकाला लागले लग्नाचे वेध यंदाच्या वर्षी बार उडण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी

बॅालिवुडस्टार आणि त्यांच्या अफेअर्सची चर्चा कायमच होत असते. त्यामुळे कोणाचं प्रेम प्रकरण नेमकं कोणासोबत सुरू आहे हे सांगणं तसं कठीण असतं, पण काही कलाकार मात्र उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली देत आपलं नातं जगजाहिर करतात. बॅालिवुडची सध्याची हॅाट जोडी असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील नातं कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. ‘पद्मावत’सारख्या सुपरहिट चित्रपटात परस्परविरोधी भूमिकांमध्ये असूनही दीपिका आणि रणवीरचीच चर्चा अधिक रंगली. या दोघांइतकीच हॅाट पेअर असलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लग्न केल्यानंतर आता दीपिका- रणवीर लग्नाच्या बेडीत कधी अडकणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिका-रणवीरलाही लग्नाचे वेध लागल्याचं समजतं.

२०१८ च्या मध्यावर म्हणजे यंदाच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा बॅालिवुडमध्ये सुरू होती, पण आता दोघांच्या जवळील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुळे यावर जणू शिक्कामोर्तबच झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच विवाहबद्ध होण्याचा रणवीर-दीपिकाचा मानस आहे. यासाठी दीपिका आणि रणवीरसोबतच त्यांचे कुटुंबियही लग्नासाठी उचित ठिकाणाच्या शोधात आहेत. आपला विवाह एखाद्या बीचवर व्हावा असं दोघांचंही म्हणणं असल्याने मालदीवमध्ये ही जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

 

About Editor

Check Also

सतलज चित्रपटानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्यावर आधारीत द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस कोर्टरूम ड्रामा

दलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलज’ चित्रपटाभोवतीचा वाद शमण्याआधीच, आणखी एका चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *