अहमदबादमध्ये शाहरुख खानला दाखल केले रूग्णालयात

शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होता. मंगळवारी अहमदाबादमध्ये KKR आणि SRH यांच्यातील प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता.

सामना संपल्यानंतर, शाहरूख खान SRK रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील आयटीसीच्या ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे त्यांचे भव्य स्वागत झाले.

सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने शाहरुखला दुपारी एकच्या सुमारास केडी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
नंतर, शाहरूख खान SRK ची पत्नी आणि डिझायनर गौरी खान, उद्योगपती जय मेहता आणि अभिनेत्री जुही चावला यांनी अभिनेता शाहरूख खानला भेटण्यासाठी भेट दिली.

भारताच्या अनेक भागांसह अहमदाबादमध्ये उच्च तापमानाची नोंद झाली आहे. गुजरातच्या राजधानीचे तापमान ४५ अंशांच्या आसपास होते आणि हवामान खात्यानेही अहमदाबाद शहरात रेड अलर्ट जारी केला आहे.

About Editor

Check Also

अभिनेता ममूटी, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री यामी गौतमीला राष्ट्रीय पुरस्कार यामी गौतम यांना आर्टीकल ३७० साठी, तर ममूटी यांना ब्रम्हयुगम तर कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी पुरस्कार

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांसाठी अभिनेते ममूटी आणि कार्तिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *