‘सिम्बा’मध्ये सोनूची एंट्री रोहीतच्या टीममध्ये आता सोनूचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी

सोनू सूद हे नाव सध्या चांगलंच गाजतंय. अॅक्शनपटांपासून चरित्रपटांपर्यंत आणि मसालापटांपासून कॅामेडीपटांपर्यत वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या सिनेमांद्वारे सोनू रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. हिंदीसोबतच दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप सोडणाऱ्या सोनूची एंट्री रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या आगामी बहुचर्चित ‘सिम्बा’ या सिनेमात झाली आहे.

करण जोहरची निर्मिती आणि रोहत शेट्टीचं दिग्दर्शन यामुळे चित्रीकरणापूर्वीच ‘सिम्बा’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात सारा अली खानची एंट्री झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आम्ही दिली होती. आता सोनूची एंट्री होणं हे या सिनेमातील पुढील अपडेट्स आहेत. आजही सोनूला सलमान खानच्या ‘दबंग’मधील छेदी सिंह म्हणून ओळखलं जातं. ‘दबंग’नंतर सोनूने बऱ्याच सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या, पण रसिकांच्या मनातील सोनूची छेदी सिंहची इमेज आजही कायम आहे. ‘सिम्बा’च्या माध्यमातून आपली एक नवीन इमेज तयार करण्याची संधी सोनूकडे असल्याचं सिनेमाशी निगडीत असलेल्या सूत्रांचं म्हणणं आहे. शीर्षक भूमिकेतील तगड्या रणवीर सिंहसोबत काम करताना सोनू स्वत:ला सिद्ध करण्यात कितपत यशस्वी होतो ते पाहायचं आहे.

या चित्रपटातील सोनूच्या लुकवर सध्या काम सुरू असल्याचं समजतं. रोहितच्या मतानुसार या सिनेमातील सोनूचा लुक लक्षवेधी आणि आजवरच्या लुकपेक्षा अगदी वेगळा असावा. यासाठी सोनूच्या वेगवेगळ्या पद्धतीचे गेटअप्स आणि लुक्सवर मेहनत घेतली जात आहे. लहान शहरांमधील व्यक्तिरेखाही उठावदारपणे पडद्यावर सादर करीत रसिकांना मोहिनी घालण्याची कला रोहितला चांगलीच अवगत आहे. त्यानुसारच रणवीरचाही गेटअप करण्यात आला आहे. आता सोनूला रोहित कोणत्या गेटअपमध्ये फिट करतो त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

 

About Editor

Check Also

सतलज चित्रपटानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्यावर आधारीत द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस कोर्टरूम ड्रामा

दलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलज’ चित्रपटाभोवतीचा वाद शमण्याआधीच, आणखी एका चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *