महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कार २०२६ साठी नोंदणी करण्याचे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त उद्या, २७ जून २०२६ रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात “महाराष्ट्र एमएसएमई (MSME) परिषद व एमएसएमई (MSME) पुरस्कार २०२६” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

“संकल्पातून सिद्धीकडे – From Commitment to Achievement” ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असून राज्यभरातील सुमारे २,५०० हून अधिक एमएसएमई (MSME) उद्योजक, वित्तीय संस्था, उद्योगतज्ज्ञ, गुंतवणूकदार तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा आणि महिला उद्योजकता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदे दरम्यान महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये कारागीर व हस्तकला, नेक्स्टजेन एमएसएमई (MSME), डिजिटल व AI उत्कृष्टता, सेवा, उत्पादन, हरित उद्योग, महिला उद्योजक, निर्यात आणि चॅम्पियन एमएसएमई (MSME) अशा नऊ श्रेणींचा समावेश आहे. चॅम्पियन एमएसएमई पुरस्कार वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये ‘एक्सलन्स’ आणि ‘अचिव्हर्स’ या दोन उपश्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांद्वारे राज्यातील नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाभिमुख, निर्यातक्षम आणि प्रगत एमएसएमई (MSME) उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. परिषदेसाठी सर्व एमएसएमई (MSME) उद्योजकांना https://mahamsmeawards.in/summit/ या वेबसाईटवर मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जास्तीत जास्त उद्योजकांनी नोंदणी करून सहभाग नोंदवावा. तसेच एमएसएसआयडीसी (MSSIDC) संकेतस्थळ https://mssidc.maharashtra.gov.in/home/index

तसेच ७७१००००९४४ / ७७१००००९५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

About Editor

Check Also

घरगुती गॅसच्या किंमतीत २९ रुपयांनी वाढ तीन महिन्यातील ही दुसरी दरवाढ

भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत आजपासून प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *