केंद्र सरकारची एचसीएल-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजूरी ३ हजार ७०६ कोटी रूपयांचा डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स प्रकल्प उत्तर प्रदेशात उभारण्यास कॅबिनेट बैठकीत मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी (१४ मे २०२५०) झालेल्या बैठकीत एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर संयुक्त उपक्रमाला मंजुरी दिली. तसेच उत्तर प्रदेशातील जेवर येथे अंदाजे ३,७०६ कोटी रुपयांचा डिस्प्ले चिप्स उत्पादन प्रकल्पासही मंजूरी देण्यात आली.

प्रस्तावित एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले. पाच सेमीकंडक्टर युनिट्स बांधकामाच्या प्रगत टप्प्यात आहेत हे लक्षात घेऊन, प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जेवर प्लांट हे सहावे सेमीकंडक्टर युनिट असेल आणि भारताला रणनीतीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्याच्या प्रवासात पुढे नेण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

हे युनिट दरमहा २०,००० डिस्प्ले ड्रायव्हिंग चिप्सवर प्रक्रिया करेल आणि सुमारे २००० नोकऱ्या निर्माण करेल, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सेमीकंडक्टर उद्योग आता देशभरात आकार घेत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये जागतिक दर्जाच्या डिझाइन सुविधा निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकारे डिझाइन कंपन्यांचा जोरदार पाठपुरावा करत आहेत, असेही प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, देश सेमीकंडक्टरच्या उद्योगात पुढे जात असताना, इको सिस्टम भागीदारांनी भारतात त्यांच्या सुविधा स्थापन केल्या आहेत. अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च हे दोन सर्वात मोठे उपकरण उत्पादक आहेत. दोघांचीही आता भारतात उपस्थिती आहे. मर्क, लिंडे, एअर लिक्विड, आयनॉक्स आणि इतर अनेक गॅस आणि केमिकल पुरवठादार आमच्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीसाठी सज्ज होत असल्याचा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली नोकर भरती आणि सॉफ्टवेअर विकास आणि कराराचे स्वरूप बदलतोय

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *