अर्थसंकल्पाच्या तोंडावर जानेवारीत जीएसटी संकलनात वाढ वार्षिक आधाराच्या तुलनेत १२.३ टक्के वाढ

जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन १.९६ ट्रिलियन अर्थात भारतीय रूपयांमध्ये १,९५,५०६ कोटी रुपये इतके झाले आहे, जे वाढत्या देशांतर्गत आर्थिक घडामोडींमुळे वार्षिक आधारावर १२.३ टक्क्यांनी वाढले आहे, असे सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात शनिवारी वित्त विभागाने यासंदर्भातील माहिती जाहीर केली.

मागील महिन्यासाठी, भारताचे जीएसटी संकलन मागील आर्थिक वर्षातील डिसेंबरच्या आकडेवारीच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी वाढून १.७७ ट्रिलियन रुपये झाले.

यामध्ये देशांतर्गत वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात १०.४ टक्के वाढ होऊन तो १.४७ ट्रिलियन रुपये झाला आहे आणि आयात केलेल्या वस्तूंपासून मिळणाऱ्या कर महसुलात १९.८ टक्के वाढ होऊन तो ४८,३८२ कोटी रुपये झाला आहे.

या महिन्यात २३,८५३ कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले, जे २४ टक्क्यांनी वाढले आहे. परतफेडीचे समायोजन केल्यानंतर एकूण निव्वळ जीएसटी महसूल १.७२ ट्रिलियन रुपये झाला, जो १०.९ टक्क्यांनी जास्त आहे.

शनिवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने जीएसटी महसूल ११ टक्क्यांनी वाढून ११.७८ ट्रिलियन रुपये (केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरासह) होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

About Editor

Check Also

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; १८ प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या १८ विशाल व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *