श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आला असून भारताची एकूण संपत्ती ८ हजार २३० अब्ज डॉलर असल्याची माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालातून समोर आली आहे. न्यू वर्ल्ड वेल्थने जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार श्रीमंत देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ष २०१७ मध्ये ६४ हजार ५८४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अमेरिका जगातील सर्वाधिक श्रीमंत देश आहे.
श्रीमंत देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर असून चीनची एकूण संपत्ती २४ हजार ८०३ डॉलर आहे. त्यापाठोपाठ जपान (१९ हजार ५२२ अब्ज डॉलर), इंग्लंड ( ९ हजार ९१९ अब्ज डॉलर), जर्मनी (९ हजार ६६० अब्ज डॉलर) अनुक्रम तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
देशांची एकूण संपत्ती म्हणजे त्या देशातील सर्व नागरिकांची खाजगी संपत्ती होय. यामध्ये त्यांची सर्व प्रकारची देणी वजा करून सर्व संपत्तीचा समावेश केला आहे. या यादीमध्ये कॅनडा आठव्या (६ हजार ३९३ अब्ज डॉलर), ऑस्ट्रेलिया ९ व्या (६ हजार १४२ अब्ज डॉलर) आणि इटली दहाव्या (४ हजार २७६ अब्ज डॉलर) क्रमांकावर आहे.
अहवालानुसार, भारताची २०१६ मध्ये एकूण संपत्ती ६ हजार ५८४ अब्ज डॉलर होती. ही संपत्ती वाढून २०१७ मध्ये ८ हजार २३० अब्ज डॉलर झाली आहे. एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ झाली आहे.

About Editor

Check Also

महागाईचा दर ५.५४% वर टक्क्याने, ऑगस्ट महिन्यात ४.८३% वर होता प्रतिकूल बेस इफेक्ट'नेही (base effect) मुख्य महागाई दर वाढ

रिझर्व्ह बँकेने (RBI) साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच व्याजदर वाढवल्यानंतर काही दिवसांतच, सप्टेंबरमध्ये भारताचा मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *