अरविंद सावंत यांची अखेर शायना एन सी प्रकरणी जाहिर दिलगिरी; पण या नेत्यांची नावे घेतली शिवसेना शिंदे उमेदवार शायना एन सी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अमिन पटेल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत बोलताना हम इर्म्पोटेड माल का प्रचार नही करते हम ओरिजनल माल का प्रचार करते है असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता अरविंद सावंत यांच्या वक्तव्यात कोणत्याही प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराचे किंवा इतर कोणाचे नाव घेतले नव्हते. मात्र ते वक्तव्य शिंदे शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांना उद्देशून केल्याचा दावा करण्यात आला.

त्यानंतर अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे शिवसेने पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने टीकाही करण्यात आली. त्याचबरोबर अरविंद सावंत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला. त्यानंतर शायना एनसी यांनीही अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नागपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर पोलिस ठाण्यात रितसर अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी आज शायना एन सी प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे असल्याचे जाहिर केले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, मी कोणत्याही महिलेला उद्देशून ते वक्तव्य केले नव्हते. मात्र वक्तव्याचा चुकीचा अर्ध घेत माझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. आता या प्रकरणावर मी पडदा टाकू इच्छितो असे सांगत माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांची माफी मागितली.

यावेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, भाजपाच्या आशिष शेलार यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. ठाणे येथेही एकनाथ शिंदे यांच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला. पण त्या विरोधातही गुन्हा दाखल झाला नाही. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला का, संजय राठोड यांच्यासारखा व्यक्ती तुमच्यासमोर आहे. राम कदम, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असा सवालही यावेळी केला.

अरविंद सावंत पुढे बोलताना म्हणाले की, माझे वक्तव्य असन्मानजनक वाटत असेल तर या सर्वांची वक्तव्ये सन्मान देणारी वाटतात का असा सवाल करत पुढे म्हणाले की, कोणाच्याही भावना दुखावाव्यात कोणत्याही भगिनीचा अवमान व्हावा असं मी माझ्या आयुष्यात केलं नाही. मी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत याप्रकरणी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

About Editor

Check Also

उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *