न्यायालयाचा सवाल, राऊत यांच्या बोलण्याची ईडीला अडचण नाही तर तुम्हाला का…? बोलण्यास अटकाव करणाऱ्या पोलिसांचे कोर्टाने उपटले कान

पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्याऐवजी राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला. मात्र आज सुनावणीवेळी न्यायालयाच्या आवारात प्रसार माध्यमांशी राऊत यांच्या बोलण्याचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांनाच प्रति सवाल करत त्यांच्या बोलण्याची ईडीला अडचण नाही तर तुम्हाला का व्हावी? असे सुनावले.

तसेच या प्रकरणी न्यायालयाने हे प्रकरण राजकीय नाही, ईडीचा कोणताही विरोध नाही, मग तुमच्या पोटात का दुखतंय असं म्हणत पोलिसांना चांगलेच फटकारून काढले आहे. सध्या कोठडीत असलेल्या संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करताना न्यायालयाच्या परिसरात ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलले. तर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सोबतही त्यांनी चर्चा केली होती. त्याचा तपशील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यावरून पोलिसांनी संजय राऊत यांना न्यायालयाच्या परिसरात भेटणाऱ्यांना प्रतिबंध घालावा अशी मागणी करत न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त वकील आणि मान्यता प्राप्त कुटुंबिय वगळता राऊत यांच्याशी बोलण्यापासून, पत्रकारांनाही रोखण्याची मागणी पोलिसांनी केली.

पण, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे. संजय राऊत हे न्यायालयाच्या आवारात माध्यमांसोबत बोलत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायालयाकडे केली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांचे चांगलेच कान उपटले. त्यावर ‘तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीच म्हणता की हे राजकीय केस नाही, मग ते लोकप्रतिनिधी आहेत किंवा आरोपी आहे जे बोलतात. याबाबत ईडीला काहीच अडचण नाही, असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच झापलं. यावर पोलिसांनी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो असे सांगताच पोलिसांच्या या उत्तराने न्यायाधीश संतापले. ‘इथे काय गोळीबार होईल का? लेखी द्या, मग मी त्यावर निर्णय घेईल. मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, डबा खातात, जर ते राजकीय विधान करत असतील तर ईडीला काय अडचण आहे कारण ही राजकीय केस नाही, असे ईडीच म्हणत आहे. न्यायालयाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना आणि ईडीला खडेबोल सुनावले.

संजय राऊत यांना पत्रकारांसोबत संवाद साधताना अंधेरी पूर्व पोट निवडणुकीवर भाजपाला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र, हा स्क्रिप्टचा भाग होता. अंधेरी पूर्व निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ४४ हजाराच्या मताधिक्याने जिंकणार होती. यामुळेच भाजपाने उमेदवार मागे घेतला पराभवाच्या चाहूल लागल्यामुळे भाजपाने उमेदवार अर्ज मागे घेतला, भाजपाने या मतदारसंघात वैयक्तिक सर्व्हे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणाऱ्या संदर्भात माहिती मिळाली होती. एकनाथ खडसे यांच्यासोबत चर्चा आज कोर्टात सबकुछ ओके – एकनाथ खडसे आणी संजय राऊत यांची सत्र न्यायालयात झाली भेट दोघांत झाली काही मिनिटं अनौपचारिक चर्चा खडसेंनी केली, राऊत यांची आस्थेनं विचारपूस राऊतांनीही दिलं हसून उत्तर दिलं त्यावर सबकुछ चिंता करू नका मी लवकरच येणार बाहेर असे राऊत यांनी संवाद साधला होते.

About Editor

Check Also

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *